Type Here to Get Search Results !

सिडको वाळूज महानगर परिसरात पाणीटंचाई वरून आमरण उपोषण

 


वडगाव-कोल्हाटी सिडको वाळूज महानगर पाणीटंचाई वरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंचायत समिती सदस्य दत्तात्रेय वर्पे यांचे उपोषण : विभाग प्रमुख तिसगाव विनोदजी दाभाडे, युवा सेना शहरप्रमुख मा श्री आमोल काका अशोक होर्शीळ,व डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचा चे अध्यक्ष अशोकजी वाहुळ यांनी दिला पाठींबा

छत्रपती संभाजीनगर, दि. 12 मे 2026 : वडगाव-कोल्हाटी, सिडको-वाळूज महानगर परिसरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पंचायत समिती सदस्य श्री. दत्तात्रेय वर्पे यांनी एमआयडीसी कार्यालयासमोर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणस्थळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विभाग प्रमुख तिसगाव विनोदजी दाभाडे, युवा सेना शहरप्रमुख मा.आमोल काका अशोक होर्शीळ जिल्हा परिषद व व डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच चे अध्यक्ष अशोकजी वाहुळ, व राहुल भैय्या जाधव यांनी आज भेट देऊन जाहीर पाठींबा दिला.

उपोषणस्थळी नागरिकांशी संवाद साधल्यानंतर .

शहर प्रमुख मा,श्री, आमोल काका अशोक होर्शीळ, “वडगाव-कोल्हाटी, बजाज नगर व वाळूज महानगरातील हजारो कुटुंबे गेल्या महिनाभरापासून थेंब-थेंब पाण्यासाठी तडफडत आहेत. महिला-भगिनींना टँकरच्या मागे धावावे लागत आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे.”

वाढीव पाणी द्यावे, बंद जलवाहिन्या दुरुस्त कराव्यात व नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी ठाम मागणी वरपे यांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास शिवसेना (उबाठा) पक्ष नागरिकांसह रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला,

पं.स. सदस्य दत्तात्रय वर्पे म्हणाले, वारंवार निवेदने देऊनही प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. नाईलाजाने उपोषण सुरू केले. जोपर्यंत पाणी सुरळीत होत नाही, तोपर्यंत माघार नाही.

यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी, युवा सेना व डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचा चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments