Type Here to Get Search Results !

वडगाव को. येथील झोपडपट्टी भागात खाऊ वाटप; व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन

वडगाव को. येथील झोपडपट्टी भागात खाऊ वाटप; व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन.


वडगाव को. येथील झोपडपट्टी भागात खाऊ वाटप; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन 
छत्रपती संभाजीनगर, दि. 21 जुलै 2026 : संकल्प सेवेचा फाउंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव को. (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील झोपडपट्टी परिसरात लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरीचे सहसचिव लायन भूषण देवरे, संकल्प सेवेचा फाउंडेशनचे अध्यक्ष रविंद्र देवरे, समन्वयक मोहित देवरे, गणेश कराड, शैलेश घोरतळे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी परिसरातील काही विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी शाळेची आवश्यकता व्यक्त केली. त्यावर संकल्प सेवेचा फाउंडेशन आणि लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील तसेच लवकरच त्यांच्या शैक्षणिक जबाबदारीची धुरा उचलण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. सामाजिक बांधिलकी जपत गरजू मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याबरोबरच त्यांच्या शिक्षणासाठीही सकारात्मक पाऊल उचलण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


Post a Comment

0 Comments