कार्यक्रमाचे आयोजन शहरातील मध्यवर्ती सभागृह, स. भू. शिक्षण संस्था येथे करण्यात आले होते. समाजाच्या उन्नतीसाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे, हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून Lions Club of Pessac Aquitaine (फ्रान्स) येथील प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच लायन भूमिका सिंग (अध्यक्ष, लायन्स क्लब, द्रोणागिरी), सौ. मोनिका सागर चौकर (संचालिका, द्रोणागिरी फाउंडेशन), लायन सागर विनायक चौकर (मा. अध्यक्ष, लायन्स क्लब, द्रोणागिरी) यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात मा. डॉ. उज्ज्वला दहिफळे (प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जन),मा. श्री. धनंजय आकात(संचालक, रिलायबल फाउंडेशन), मा. श्री. हर्षद बर्गे(टेंडर गुरु), तसेच मा. सुमेध गायकवाड (संस्थापक अध्यक्ष, युवा फाउंडेशन) यांची मान्यवर उपस्थिती होती व निवेदन श्रुती दिलीप तायडे हिने केले.
सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ‘सेवा प्रेरणा सन्मान’ आणि ‘छत्रपती संभाजीनगर भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी समाजकार्याच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले व सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजन श्री. रविंद्र श्रीराम देवरे (अध्यक्ष), सौ. योगिता रविंद्र देवरे (कोषाध्यक्ष) व भूषण रविंद्र देवरे (सचिव) यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.
या भव्य सोहळ्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये सामाजिक कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून, समाजसेवकांच्या कार्याचा गौरव करण्याची ही परंपरा पुढेही सुरू राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments